चिपळूण (प्रतिनिधी) : एसव्हीजेसीटी डेरवण येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आंबडस विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यशाची नोंद केली आहे. पार्थ निलेश कदम यांनी ४०० मीटर हर्डल्स स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून विभागस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच नेहा संतोष मोरे हिने ४०० मीटर हर्डल्स आणि ८०० मीटर धावणे या दोन्ही स्पर्धांमध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे. विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक भास्कर महाडिक, प्रशिक्षक संतोष शिंदे, तसेच मार्गदर्शक गणेश सावर्डेकर आणि कृष्णकांत कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक वसंत यादव व शालेय समितीचे चेअरमन अशोक निर्मळ यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल विद्यालयात आनंदाचे वातावरण असून सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.











