चिपळूण (प्रतिनिधी) : तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने चिपळूण तालुक्यातील डेरवण क्रीडासंकुलात झालेल्या ३५व्या ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याने सांघिक द्वितीय स्थान पटकावले. पुमसे दुहेरी प्रकारात भार्गवी पवार व योगराज पवार यांनी सुवर्णपदक, साई सुवारे,श्रुती काळे, भार्गवी पवार यांनी सांघिकमध्ये रौप्यपदक मिळवले.
वैयक्तिक साई सुवारे हिने कांस्य पदक मिळवले. फ्री स्टाईल पुमसे या प्रकारात गार्गी बाकलकर सुवर्णपदक,तर सांघिक साई सुवारे ,दिव्या नागर,वेदांत देसाई,योगराज पवार यांनी सुवर्णपदक वैयक्तिक तेजस भुवड,दिव्या गुरव, रुद्र नलगे यांनी रौप्यपदक मिळवले.राज्य संघटना महासचिव मिलिंद पठारे,शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रवीण बोरसे,राज्य संघटना कोषाध्यक्ष वेंकटेशराव करा ,जिल्हा संघटना सचिव लक्ष्मण करा,शशांक घडशी, संजय सुर्वे आदी पदाधिकाऱ्यांनी पदकप्राप्त खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले.












