रॉक गार्डन आज प्रकाशमान होणार

 

 

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सुचनेनुसार प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही : भाजपा शहर तालुकाध्यक्ष विष्णु मोंडकर

मालवण : वादळी वातावरणात मालवण रॉक गार्डन येथील वीज मिटर व सर्व वीज वायर जळून गेल्याने ऐन पर्यटन हंगामात वीज पुरवठ्या अभावी रॉक गार्डन रात्रीच्या वेळी अंधारात होते. याबाबत माहिती पालकमंत्री नितेश राणे यांना मालवण भाजपच्या माध्यमातून देण्यात आली. त्यानुसार प्रशासनास तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व वीज जोडणी नव्याने करून आज रॉक गार्डन प्रकाशमान होणार आहे. अशी माहिती भाजपा मालवण शहर तालुकाध्यक्ष विष्णु मोंडकर यांनी दिली.

 

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून दरवर्षी दहा लाखा पेक्षा जास्त पर्यटक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी मालवण येथे भेट देत असतात. मालवण येथील रॉक गार्डन ला देखील पर्यटक मोठया संख्येने भेट देतात. रात्री च्या वेळेत पर्यटकांची गर्दी अधिक असते. मालवण शहरा बरोबर वायरी तारकर्ली देवबाग तोंडवळी आचरा येथे निवास करणारे पर्यटन रात्रीच्या वेळी पाहण्यासाठी एकमेव पर्यटन असल्याने भेट देतात. गेले काही दिवस वादळी वातावरणामुळे रॉक गार्डन ला विद्युत पुरवठा करणारी वायर व मीटर जळाल्याने रॉक गार्डन मध्ये विद्युत पुरवठा बंद आहे. यांची माहिती भाजपा मालवणच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ सदर विषय मार्गी लावायच्या सूचना मालवण नगरपरिषदला दिल्या. त्यानुसार मालवण नगरपरिषदने नवीन मीटर साठी आवश्यक रक्कम विद्युत विभागास भरणा केली असून मिटर आणि जळालेली केबल दुरुस्ती आज पूर्ण होऊन रॉक गार्डन रात्री प्रकाशमान होईल. अशी माहिती बाबा मोंडकर भाजपा तालुका अध्यक्ष मालवण यांनी दिली आहे.