SIR फॉर्म भरणे उपक्रमास मालवण नगरसेविका तथा स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांचे विशेष सहकार्य
सहकार्याच्या भावानेतून पुनम चव्हाण यांचा सेवाभावी उपक्रम
मालवण | प्रतिनिधी : SIR फॉर्म मतदार सखोल निरीक्षण पुनर्यादी या शासनाच्या कार्यक्रमा अंतर्गत मतदार आपली जबाबदारी या अनुषंगाने नगरसेविका तथा नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी आपल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये नगरसेविका आपल्या दरी या संकल्पनेतून SIR फॉर्म भरणे उपक्रमास निवडणूक अधिकारी blo यांना सहकार्य करतं आहेत.
निवडणुक विभागाच्या वतीने मतदार यादीची विशेष आणि सखोल पडताळणी प्रक्रिया सर्वत्र सुरु आहे.
मतदार यादीत नावे जोडणे. नाव रद्द करणे: मृत पावलेल्या, स्थलांतरित झालेल्या किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव असलेल्या बोगस मतदारांची नावे यादीतून वगळणे. पडताळणी: BLO (Booth Level Officer) घरी येऊन तुमच्या कुटुंबाची आणि मतदारांची माहिती तपासून ‘SIR Form’ भरून घेतले जात आहेत. प्रक्रियेत सहकार्य या भावानेतून नगरसेविका पुनम चव्हाण यांनी नगरसेविका आपल्या दारी ही विशेष मोहीम सुरु केली आहे.












