देवगड सभापती गणेश राणे यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती
सद्यस्थितीत जिल्ह्यात रक्ताचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याची बाब लक्षात घेऊन मा. नाम.नितेशजी राणे साहेब, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्या २३ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त देवगड पंचायत समिती यांच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान शिबिर हा प्रमुख उपक्रम असून पंचायत समिती सदस्य व अधिकारी / कर्मचारी वृंदाच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या प्रसिद्धी पत्रकात नाम.नितेशजी राणे साहेब, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्या वाढदिवसानिमित्त २३ जून 2026 रोजी पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्ग अशा सुमारे ५० जणांचा रक्तदानात सहभाग राहणार आहे. वाढदिवस केवळ औपचारिक न साजरा करता समाजाला उपयोगी पडेल अशा पद्धतीने साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
याशिवाय देवगड ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप, पंचायत समिती आवारात वृक्षारोपण तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवून पालकमंत्र्यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
या रक्तदान शिबिरात सर्व सदस्य कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे संयुक्त रित्या आवाहन सभापती गणेश राणे व उपसभापती अमोल लोके यांनी केले यावेळी माजी उप सभापती अमोल तेली उपस्थित होते.












