प. पु. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज पुण्यतिथी सोहळा 2 नोव्हेंबर रोजी

ओटवणे (प्रतिनिधी ) प. प. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती महाराज यांच्या गुरु परंपरेतील वैद्य मंत्र शास्त्रज्ञ प. पु. बाबा महाराज मानवतकर यांचे पट्टशिष्य वै. प. पु. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांची बारावी पुण्यतिथी कार्तिक शुद्ध प्रबोधीनी एकादशी या दिवशी रविवार 2 नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानी ओटवणे कापई वाडी येथील त्यांच्या समाधी स्थळी मंदिरात होणार आहे यानिमित्त पहाटे 5 ते 7 वा. श्रींची काकड आरती, 9 वा.सर्व देवता पूजा,श्री गुरुमूर्तीला महाअभीशेक,11 ते 12 वाजता श्रीं गुरुदत्त भजनी मंडळ संत तुकाराम नगर पिंपरी यांचे वारकरी संप्रदायिक भजन,12.20 ते 1 महाआरती, 1 ते 3 महाप्रसाद, संध्याकाळी 5 ते 7 वा. वारकरी संप्रदायिक हरिपाठ, रात्री 7 वा. आरती, रात्रौ 8 ते 10 ह. भ. प. टाव्हरे महाराज (मंचर ) यांचे वारकरी सांप्रदायिक कीर्तन, आदीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. गुरुकृपेने आयुर्वेदच्या माध्यमातून हजारो रोगी बरे करत असंख्य भक्तांना व्यसना पासून मुक्ती देत कुटुंब कल्याण करणाऱ्या कुडाळाकर महाराजांचे देशातच नव्हे अमेरिका, जर्मनी, युरोप, मॉरीशीअस देशातही शिष्य गण आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहून सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व भक्त भाविक शिष्यगण यांना प. पू. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज समाधी मंदिर ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.