महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिपळूण तालुक्याची निवडणूक नियोजन बैठक संपन्न

चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुरुवारी चिपळूण शासकीय विश्रामगृह पाग येथे राज ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर रत्नागिरीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवलकर, गुहागर विधानसभा संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, चिपळूण तालुका अध्यक्ष विश्वनाथ डोळस यांच्या नेतृत्वामध्ये चिपळूण तालुका व चिपळूण शहर येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी बैठक आयोजित केली होती.

या बैठकीमध्ये पक्षाची संघटना बांधणी, नवीन नियुक्ती, पक्षप्रवेश, गावागावामध्ये संघटना उभी करणे, जि.प. व पंचायत समिती गणनिहाय नियुक्ती व सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाकडून पडलेल्या आरक्षण नुसार इच्छुक उमेदवार यांचा आढावा व पुढील नियोजन विषयी चर्चा करण्यात आली. कोणत्या भागातून कोण उमेदवार उभा राहणार व तेथील परिस्थिती चा आढावा घेण्यात आला. तसेच चिपळूण शहरामध्ये नगरपरिषद निवडणुकी विषयी १४ प्रभागातील इच्छुक उमेदवार कोण-कोण आहेत, याचाही आढावा घेऊन त्यावर योग्य निर्णय आणि पक्षहितासाठी, संघटना वाढीसाठी चर्चा करण्यात आली. येणाऱ्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्यासाठी अपेक्षित यश आणि युतीचा प्रस्ताव विषयी वरीष्ठांशी चर्चा करून युती की स्वबळावर लढायचं यावर मार्गदर्शन सर्व पदाधिकारी यांच्याशी करण्यात आले. चिपळूण ग्रामीण व शहर विभाग मध्ये निवडणूकीला सामोरे जायचं.फक्त राजसाहेब ठाकरे समर्थक आणि मनसैनिक म्हणून पक्षाची ताकद आपल्याला दाखवायची आहे.आपल्या कामातून जनते पर्यंत पोहचून,मतदान यादीचा बूथ वाईज अभ्यास करून बोगस मतदानाला विरोध करायचं आहे. ही निवडणुक सर्वांनी मिळून लढवायची आहे. यावर सर्व मनसैनिक यांनी आग्रह धरला आहे.याला यश येईल एकजुटीने मिळून काम करायचं असा निश्चय करण्यात आला. यावेळी चिपळूण तालुक्यातील जि.प.गट वहाळ, उमरोली, सावर्डे, अलोरे, शिरगांव, मालदोली, कळवंडे, पेढे, खेर्डी या जि.प. गटामध्ये व पंचायत समिती गणामध्ये उमेदवार उभे करण्याचा नियोजन झाले आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना आपआपल्या भागात काम करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. तसेच चिपळूण नगर परिषद हद्दीमधील प्रभागानुसार प्रत्येक वार्डमध्ये मनसे आपले उमेदवार देण्यासाठी सज्ज झाली आहे.

या बैठकीवेळी गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खेतले, शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष उमेश लटके, चिपळूण उपतालुका अध्यक्ष संतोष हातिस्कर, रवींद्र जाधव, नरेश निवळकर, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष मिलिंद कदम, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष सागर चिले, मा.ता.सचिव संदेश साळवी, माजी शहराध्यक्ष प्रशांत सावर्डेकर, मनविसे शहरअध्यक्ष गुरु पाटील, शहर सचिव स्वप्नील घारे, मनसे का. सरचिटणीस रवींद्र काणेकर, विनोद चिपळूणकर, रमेश वेलोंडे, चिपळूण तालुका प्रसारमाध्यम प्रमुख सूरज द.घाग आणि सर्व विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष,सर्व मनसैनिक यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली.