कांदळगाव येथील भात नुकसानीची पाहणी!

मसुरे | झुंजार पेडणेकर : कांदळगाव येथे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीची सरपंच रणजित परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पाहणी करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी साक्षी पिंगुळकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष पारकर,शारदा मुळये, विहार कोदे, पोलीस पाटील अक्षीता राणे, पोलीस पाटील शितल परब, तलाठी शिंदे, कृषी साहाय्यक विवेक रंगे, नुकसान ग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.