रत्नागिरी : प्रतिनिधी
सिनेमा तिकिट बुकिंगबाबत माहिती देण्याच्या बहाण्याने अज्ञाताने प्रौढाची तब्बल 93 हजारांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 22 अप्टेंबर 2025 ते 25 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 ते 5.17 वा. कालावधीत घडली आहे
याबाबत अजित सदानंद प्रिलणकर (50, रा. पुष्पेंद्र कॉम्प्लेक्स शेरेनाका ब्राङग्राव, रत्नागिरी) यांनी सोमवार 3 नोव्हेंबर रोजी शहर पोलिस गुण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादि हे ऑनलाईन सिनेमा तिकिट बुकिंग बाबत माहिती घेत होते. त्यावेळी अज्ञाताने त्यांना तिकिट बुकिंगची माहीती देताना त्यांच्या व्हाट्सअपवर एक लिंक पाठवली फिर्यादिने ती लिंक ओपन करुन त्यात माहिती भरल्यानंतर अज्ञाताने त्यांच्या च्या बैंक खात्यातून प्रथम 8 हजार आणि त्यानंतर 85 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून 93 इजारांची फसवणूक केली, याबाबत फिर्यादीने एक महिन्यानंतर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.













