डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले

मंडणगड |प्रतिनिधी : जुलै 2022 मध्ये झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड, या विद्यालयातील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये प्राथमिक गटातील१) कुमार. रविराज नितेश हुंबरे २)कुमारी.श्रेया विनायक पवार व माध्यमिक गटातील १)कुमार.पार्थ नारायण कोकाटे या विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले आहे. विद्यालयाच्या वतीने सन्माननीय मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा पाटील मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. अर्जुन हुल्लोळी सर, पर्यवेक्षक श्री. शांताराम
बैकर सर यांनी या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले.
असेच उज्वल यश मिळवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.