शिवम महिला प्रभागसंघ माजगावची मूल्यांकन कार्यशाळा उत्साहात संपन्न

सावंतवाडी । प्रतिनिधी :
शिवम महिला प्रभागसंघ, माजगाव आयोजित मूल्यांकन कार्यशाळा चराठा शाळा क्रमांक १ येथे मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली. या कार्यशाळेत लोकप्रतिनिधी व विविध महत्त्वाच्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते ज्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. या ​कार्यशाळेला चराठा गावच्या अध्यक्षा प्रचिती कुबल, वेत्ये गावचे अध्यक्ष गुणाजी गावडे, साेनूर्लीचे उपाध्यक्ष भरत गावकर, चराठाचे उपाध्यक्ष अमित परब आणि ओटवणे गावचे अध्यक्ष रविद्र म्हापसेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. तालुका स्तरावरून स्वाती रेडकर यांनीही सहभाग घेतला.

​याशिवाय, कुटुंबश्री केरळ राष्ट्रीय संसाधन संस्था मधून गिरिजा संतोष या मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून, तसेच श्रावणी वेटे जिल्हा संसाधन व्यक्ती , आणि प्राची राऊळ गट संसाधन व्यक्ती यांची उपस्थिती होती. ​सर्व उपस्थित मान्यवरांनी यावेळी प्रभागसंघ सदस्यांना पंचायती राज संस्था आणि समुदाय आधारित संस्था यांच्या समन्वयाचे महत्त्व, मूल्यांकन प्रक्रिया आणि ग्रामीण विकासातील महिलांच्या भूमिकेबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

​ ​या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत प्रभागसंघाच्या कार्यकारी समिती सदस्य, सर्व कार्यरत स्थानिक संसाधन व्यक्ती, समुदाय संसाधन व्यक्ती भगिनी, प्रभागातील बालसभा सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम शिवम महिला प्रभागसंघाच्या भविष्यातील कार्यास नवी दिशा देणारा व समन्वय अधिक दृढ करणारा ठरला.