वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त
नागरिकांच्या मदतीने ट्रेलर बाहेर काढला
कणकवली : कणकवली-आचरा मार्गाला जोडणाऱ्या किनई रोडवरील मोठ्या खड्ड्यात बुधवारी सायंकाळी ६ सुमारास एक ट्रेलर अडकला. त्यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रेलर बाहेर काढण्यात आला आणि या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.












