सराव परीक्षा ही पूर्वतयारीची संधी भविष्यात स्पर्धा परीक्षा अपरिहार्य –राजन चिके.

फोंडा केंद्रस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा संपन्न !

फोंडाघाट : आता विद्यार्थी- पालकांसाठी स्पर्धा परीक्षा अपरिहार्य झाल्या आहेत.आपला पाल्य आयुष्यात उज्वल यश मिळवण्यासाठी चौथी /सातवी शिष्यवृत्ती परीक्षा हा संस्कारक्षम पाया आहे. आणि तो मजबूत करण्यासाठी केंद्रस्तरावर घेतली जाणारी सराव परीक्षा मुलांसाठी आपली गुणवत्ता सिद्ध करणारी संधी आहे.आपल्या केंद्रातील शाळांमधून जास्तीत जास्त मुला- मुलींना या परीक्षेत बसविल्यास त्यांना भावी स्पर्धा परीक्षेची भीती न राहता, सराव होईल आणि त्यांना काठिण्य प्रसंगात सामोरे जाण्याची सवय लागेल .त्यासाठी पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांनी समन्वयाने काम केल्यास, जास्तीत जास्त मुले मेरीट मध्ये येतील.त्याकरिता आवश्यक सहकार्य फोंडाघाट मधील पालक, ग्रामस्थ आणि आम्ही करू. असे मार्गदर्शन पर विचार फोंडा जि.प.सदस्य राजन चिके यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन दिलीप शेळके यांनी केले.

फोंडाघाट केंद्रस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा व गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यावेळी मार्गदर्शक विचारमंथनामध्ये प.स.सदस्य पवन भालेकर, उपसरपंच तन्वी मोदी, केंद्रप्रमुख तळेकर, सुंदर पारकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय रेवडेकर संतोष जोईल इत्यादींनी सहभाग घेतला. या सर्वांनी सराव परीक्षांचे महत्त्व,पालक व शिक्षकांची भूमिका आणि अपेक्षा व्यक्त केल्या.मुख्याध्यापिका श्रेया नानचे, केंद्रातील सहकारी शिक्षक तसेच ग्रामस्थ आणि परीक्षार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ….