प्राथमिक शिक्षक समिती शाखा लांजा तर्फे ९ नोव्हेंबर रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

लांजा (प्रतिनिधी):  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या लांजा शाखेच्या वतीने रविवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी लांजा शाळा क्रमांक ५ च्या सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .
या गुणगौरव कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, नवोदय विद्यालय निवड विद्यार्थी, नासा इस्त्रो निवड विद्यार्थी, आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळा तसेच सेवानिवृत्त सभासद आदींचा गुणगौरव व सत्कार करण्यात येणार आहे .
हा कार्यक्रम संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.‌ तसेच व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, विस्तार अधिकारी चंद्रकांत पावस्कर, राज्य ऑडिटर अंकुश गोफणे, राज्य प्रतिनिधी विलास जाधव, शिक्षक नेते अरविंद जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अनाजी मासये, जिल्हा उपाध्यक्ष राजेश शिर्के, माजी विस्तार अधिकारी शंकर रणदिवे, गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, विस्तार अधिकारी श्रीमती विमल चव्हाण, राज्य सल्लागार विजयकुमार पंडित,जिल्हा नेते दिलीप महाडिक, तसेच जिल्हा कार्याध्यक्ष रुपेश जाधव ,जिल्हा सरचिटणीस संतोष पावणे, विभागीय उपाध्यक्ष परशुराम मासये, जिल्हा सल्लागार मधुकर चौगुले हे उपस्थित राहणार आहेत .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष दिलीप दिवाळे, सचिव दिनेश झोरे ,उपाध्यक्ष सुरेश आगळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत कांबळे, कोषाध्यक्ष सुदेश आयरे, तालुका नेते तुकाराम कोलापटे यांच्यासह सर्व कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य मेहनत घेत आहेत.