*बदलत्या जगात विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंवर्धनाची गरज अधोरेखित करण्यासाठी शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्ष !*
*मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा पहिला टप्पा फोंडा येथे संपन्न*
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी —
महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “मूल्यवर्धन” कार्यक्रमांतर्गत शिक्षकांसाठी आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षणाचा पहिला टप्पा फोंडा नं. १ शाळेत यशस्वीपणे संपन्न झाला.या प्रशिक्षणात फोंडा प्रभागातील फोंंडा,घोणसरी,पियाळी,डामरे-तिवरे,हरकुळ खुर्द या पाच केंद्रातील ४३ शिक्षकांनी सहभाग नोंदवला. प्रशिक्षणादरम्यान विविध जीवनमूल्यांवर आधारित चर्चा, कृती आणि उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. बदलत्या जगात विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंवर्धनाची गरज अधोरेखित करण्यात आली.
या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन सौ.अस्मिता तावडे, श्रीमती.वरवडेकर आणि श्री.सुरनर यांनी केले.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन केंद्रप्रमुख श्री.शिवाजी पवार सर आणि श्री.सुभाष महाले सर यांनी सांभाळले.मूथ्था फाउंडेशनचे श्री. कदम हे तीनही दिवस निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये आत्ममूल्य, सहकार्य, सामाजिकता, जबाबदारी, संवेदनशीलता आणि नीतिमत्ता ही मूल्ये दृढ व्हावीत, या उद्देशाने हे प्रशिक्षण तीन टप्प्यात जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.पहिला टप्पा दिनांक ४ते ७ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विविध चर्चांमधून मूल्यनिष्ठ अध्यापन, वर्गातील उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी ठरणाऱ्या पद्धती जाणून घेतल्या.या कालावधीत शैक्षणिक प्रवासातून शिक्षकांना “मूल्यसंवर्धनाचा” नवा दृष्टिकोन मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.











