वेंगुर्ले l प्रतिनिधी :होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक च्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आपली संघटना वाढीसाठी प्रयत्न करत असताना आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी विशेष लक्ष केंद्रित केले असून उभादांडा गावच्या सलग दोन वेळा ग्रामपंचायत सदस्या तथा विद्यमान उपसरपंच श्रीम. कालेस्तिन उर्फ टीना कार्मिस आल्मेडा यांची शिवसेना उभादांडा जिल्हा परिषद मतदार संघाच्या महिला विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली.
वेंगुर्ले येथील कार्यकर्ता मेळाव्यात आम. केसरकर यांच्या हस्ते हे निवड पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख श्री. संजू परब, जिल्हा समन्वयक श्री. सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख श्री. उमेश येरम, युवा जिल्हा प्रमुख श्री. हर्षद डेरे, वेंगुर्ला तालुका महिला प्रमुख श्रीम. शीतल साळगावकर यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीम. श्रद्धा कुडाळकर यांची उपविभाग प्रमुख पदी निवड तर श्रीम. निलम तिरोडकर यांची शाखा संघटिका व श्रीम. संचिता जुवलेकर यांची बूथ प्रमुख पदी निवड करण्यात आली. यावेळी असंख्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.











