मालडीत १५ व १६ नोव्हेंबरला हरिनामाचा जल्लोष! 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पादस्पर्शाने धन्य झालेल्या मालडी गावात येत्या १५ व १६ नोव्हेंबर रोजी भक्तिभावाने हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. गावाच्या सांस्कृतिक परंपरेचा हा अखंड सोहळा यंदाही उत्साहात पार पडणार असून, भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता पाहायला मिळत आहे.

 

१५ नोव्हेंबर रोजी सकाळी देवीची पूजा, अभिषेक व अलंकाराने सप्ताहाचा शुभारंभ होईल. मंत्रोच्चारांच्या गजरात सुहासिनी देवीच्या ओटी ने प्रारंभिक विधी पार पडतील. त्यानंतर रात्रीची दिंडी हा कार्यक्रम भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

 

या सोहळ्यात २० ते २५ गावांतील भजन मंडळी सहभागी होणार असून, त्यांच्या भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर हरिनाममय होईल. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी काकड आरती, उत्तर पूजा आणि महाप्रसाद वितरणाने सप्ताहाची सांगता होईल.

 

मुंबई आणि मालडीतील ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभागी होत संत परंपरेचा गौरव आणि हरिनामाची अखंड परंपरा जपत आहेत.सर्व भक्तांनी या हरिनाम सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालडी ग्रामस्थांनी केले आहे.