२०२५ च्या आरआर कॅबल प्राइम व्हॉलीबॉल लीग (स्कॅपियाच्या सहकार्याने) मध्ये गोवा गार्डियन्सने भाग घेतल्याची घोषणा केली, तेव्हाफारशा अपेक्षा नव्हत्या. अनुभवी संघांनी भरलेल्या या स्पर्धेत गोवा नवख्या म्हणून उतरला होता. पण जिद्द, रणनीती आणि आत्मविश्वासयांच्या जोरावर त्यांनी सर्वांना चकित केले, आणि पहिल्याच हंगामात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.

कर्णधार चिराग यादव आणि प्रशिक्षक टी.सी. जोथीश यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने पूर्वतयारीत संतुलित संघ तयार केला, विदेशी खेळाडूंचीताकद आणि भारतीय खेळाडूंची सखोलता. अमेरिकन स्टार जेफ्री मेंझेल आणि नॅथॅनियल डिकिन्सन यांनी आक्रमणाची धार वाढवली, तर अरविंदन, प्रिन्स, रोहित यादव आणि दुष्यंत सिंग यांनी संघाची मजबुती वाढवली. संघाची नीती स्पष्ट होती, धाडसी खेळ, आक्रमकसर्व्हिस, अचूक ब्लॉकिंग आणि सतत हल्ल्याची वृत्ती.
३ ऑक्टोबरला बेंगळुरू टॉर्पेडोजविरुद्ध पहिल्या सामन्यात गोव्याने दमदार सुरुवात केली, पण शेवटच्या सेटमध्ये पराभव झाला (३–२). मात्र, त्यांच्या खेळातील आत्मविश्वास जाणवत होता. दुसऱ्या सामन्यातही कोची ब्लू स्पाइकर्सविरुद्ध तसाच थरार (३–२). विजय न मिळाल्यासहीगार्डियन्सने लढाऊ वृत्ती दाखवली.
७ ऑक्टोबरला त्यांनी मागील हंगामातील विजेते अहमदाबाद डिफेंडर्स यांना ३–२ ने पराभूत करून पहिला विजय मिळवला. मेंझेलच्याआक्रमणाने आणि रोहितच्या उत्कृष्ट सेटिंगने संघाचा आत्मविश्वास वाढवला.
यानंतर काही चढउतार झाले. चेन्नई ब्लिट्झविरुद्ध अरुंद पराभव झाला, पण १४ ऑक्टोबरला कोलकत्ता थंडरबोल्ट्सवर ३–० ने मोठा विजयमिळवला. प्रत्येक खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली, प्रिन्सचे ब्लॉक्स, रोहितचे सर्व्हिस आणि डिकिन्सनचे स्पाइक्स.
हैदराबाद ब्लॅक हॉकविरुद्ध थोडा अडथळा आला, पण १९ ऑक्टोबरला दिल्ली तुफान्सविरुद्ध त्यांनी दोन सेट गमावूनही जबरदस्त पुनरागमनकरत ३–२ ने विजय मिळवला. प्रिन्स आणि मेंझेलने मैदानावर जादू दाखवली.
२२ ऑक्टोबरला दिल्लीने कोलकत्ताला हरवल्याने गोव्याने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला व पहिल्याच हंगामात ऐतिहासिक कामगिरी केली.
२४ ऑक्टोबरला उपांत्य फेरीत मुंबई मीटिअर्सविरुद्ध त्यांनी जोरदार सुरुवात केली, पण शेवटी मुंबईने ३–० ने विजय मिळवला.
जरी हंगाम अखेरीस पराभवाने संपला, तरी गोवा गार्डियन्सने सर्वांचा सन्मान मिळवला. त्यांनी आठ सामन्यांपैकी पाच सामन्यांत पाच सेटपर्यंतझुंज दिली, त्यांच्या जिद्दी आणि संघभावनेचे हे उदाहरण ठरले.
गोवाच्या चाहत्यांसमोर संघाने सलाम करत हंगामाचा शेवट केला, पण त्यांच्या नजरेत ही फक्त सुरुवात आसल्याचा एकच संदेशहोता.आगामी काळात गोवा गार्डियन्स आणखी तेजस्वी कामगिरीसाठी सज्ज आहेत.











