वैभववाडी भाजपा युवा मोर्चा कार्यकारणी जाहीर

वैभववाडी l प्रतिनिधी :      वैभववाडी भाजपा युवा मोर्चाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे भाजपाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

युवा मोर्चा भाजपा कार्यकारणी पुढील प्रमाणे – अध्यक्ष – अतुल सरवटे, उपाध्यक्ष – सुशील कदम, रमेश शेळके, गुरुराज डोंगरे, उदय पांचाळ, सरचिटणीस–रुपेश गुरव, सत्यजित रावराणे,

कोषाध्यक्ष–अक्षय पाटील,

शहर अध्यक्ष–आशिष रावराणे,

चिटणीस–नागेश आडके, सदस्य–समाधान गुरव, विशाल फोंडके, शुभम पांचाळ, चंद्रकांत बोडेकर, प्रशांत कदम, सुशांत कोलते, श्रेयस नेवेरेकर, जयेश पवार यांचा समावेश आहे.

यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा उपध्यक्ष – प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, राजेंद्र राणे, मंगेश लोके, बंड्या मांजरेकर, रितेश सुतार, विलास नावळे, सिद्धेश रावराणे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.