मसुरे | झुंजार पेडणेकर
देवगड तालुक्यातील मुणगे येथील डॉ. के. एन. नायसे यांना मुणगे येथील वैद्यकीय सेवेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण सेवेनिमित १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता डॉ. नायसे यांचा मुणगे गावाच्या वतीने श्री भगवती देवालय रंगमंच येथे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर (माजी खासदार), श्री. आर. जे. पवार (तहसीलदार देवगड), डॉ. अजित लिमये,डॉ. अरुण गुमास्ते, डॉ. सुधीर शिवेश्वरकर,डॉ. सुनिल आठवले, डॉ. अविनाश झाटये,डॉ. सतिश लिंगायत, सरपंच सौ. अंजली सावंत,
श्री. ओंकार पाध्ये (अध्यक्ष, श्री देवी भगवती देवस्थान मुणगे), डॉ. सुजित कदम उपस्थित राहणार आहेत.
उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.










