झेप महिला प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा वेंगुर्ले येथे संपन्न..

आदर्श समूह, ग्रामसंघ, उत्पादक समूह, सीआरपी व यशस्वी उद्योजिकांचा केला गौरव

वेंगुर्ले : दाजी नाईक 

झेप महिला प्रभागसंघ, उभादांडा यांच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा वेंगुर्ले येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी प्रभागसंघातील आदर्श समूह, आदर्श ग्रामसंघ, आदर्श उत्पादक समूह, आदर्श सीआरपी तसेच यशस्वी उद्योजिकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमस्थळी प्रभागसंघातील विविध उत्पादक समूहांनी उभारलेल्या स्टॉलद्वारे स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते, त्यालाही चांगला प्रतिसाद लाभला.

वेंगुर्ले येथील साई दरबार हॉल येथे जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर प्रार्थना व स्वागतगीत सादर करण्यात आले. प्रभागसंघाच्या अध्यक्षा सौ. उर्वी गावडे यांनी वार्षिक अंदाजपत्रक सभेसमोर मांडून मंजुरी घेतली. कोषाध्यक्ष सौ. दीपश्री धुरी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले, तर सचिव सौ. साईशा रेडकर यांनी आर्थिक व्यवहारांचा अहवाल सादर केला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजना’ अंतर्गत तालुका व जिल्हास्तरावर नामांकन मिळवून विभागस्तरापर्यंत पोहोचलेल्या अणसूरचे सरपंच सत्यविजय गावडे आणि टीम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वरा देसाई व सौ. मानसी आंगचेकर यांनी केले.

या कार्यक्रमास अणसूरचे सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच सौ. मालवणकर मॅडम, परबवाडा सरपंच सौ. बांदेकर मॅडम, असोलीचे सरपंच बाळा जाधव, युनियन बँकेच्या माननीय अधिकारी तसेच माजी सभापती सारिका काळसेकर मॅडम, तुळस प्रभाग समन्वयक आंगचेकर मॅडम, म्हापण प्रभाग समन्वयक मा. रेखा परुळेकर, आडेली प्रभागसंघ सचिव मा. चेंदवणकर मॅडम, रेडी प्रभागसंघ अध्यक्षा अमृता बागकर, तुळस प्रभागसंघाचे पदाधिकारी, ब्लॉक अँकर तेजस पेडणेकर तसेच महिला व बाल विकास विभागाच्या अंजली शेणई व त्यांचे सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षा सौ. उर्वी गावडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले, तर प्रभागसंघाचे प्रभागसमन्वयक श्री. सागर आवळेगावकर यांनी प्रभागसंघाची पुढील वाटचाली चे नियोजन कसे असेल याबत मार्गदशन करून उपस्थित सर्वांचे आभार मानले. प्रभागसंघ अंतर्गत कार्यरत प्रभागसंघ व्यवस्थापक भाईडकर मॅडम सर्व ग्रामसखी केडर,सर्व ग्रामसंघांचे पदाधिकारी, लिपिका सर्व महिला सभासद यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.