राजापुरात रविवारी नगरसेवकपदासाठी तीन उमेदवारांचे अर्ज दाखल

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार १६ नोव्हेंबर रोजी ३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार विकास गंबरे यांच्याकडे दाखल केले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या आजच्या सातव्या दिवशी प्रभाग. क्र.३ ‘ब’ विनय सदाशिव गुरव, शिवसेना (उबाठा), प्रभाग. क्र.४ ‘अ’ मधून गार्गी गणेश चिपटे, शिवसेना (उबाठा) तर प्रभाग. क्र.४ ‘ब’ मधून संजय मनोहर पवार शिवसेना (उबाठा) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. रविवार अखेर नगराध्यक्षपदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी सात उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

सोमवार १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारिख आहे. या आता केवळ एकच दिवसाचा कालावधी उरला असून सोमवारी अंतिम दिवशीच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह दहा प्रभागांतील २० नगरसेवक पदासाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास सोमवारी १० नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून १७ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. असून अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत २१ नोव्हेंबर पर्यंत असून, निवडणूक चिन्हांचे वाटप २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

————————————————————–