खेड (प्रतिनिधी) – 2025 च्या खेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पद महिलांसाठी राखीव घोषित झाले असून या ठिकाणी युतीच्या वतीने सौ मानवी राजेश बुटाला यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्या साठी केवळ एक दिवस शिल्लक राहिला असून विविध राजकीय पक्षांचे इच्छुकांची निवडणूक अर्ज दाखल करण्यास गर्दी होत असताना पहावयास मिळत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधून युतीच्या उमेदवार सौ. नीता केतन आंब्रे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज रविवार 16 नोव्हेंबर रोजी दाखल केला असून यावेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षितता, सक्षमीकरण आणि प्रगतीसाठी स्पष्ट भूमिकेसह आपण ही निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केले आहे.
सध्याच्या काळात महिलांवरील वाढते अत्याचार, अन्याय आणि असुरक्षितता पाहता महिलांना सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. महिलांसाठी सुरक्षित पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, रोजगाराच्या संधी, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर त्यांचा भर राहणार आहे. तथापि महिलांसाठी काम करताना पुरुषांवर अन्याय होऊ देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “महिला–पुरुष समान प्रगती करावीत, हेच आमचे ध्येय आहे. महिलांचे सक्षमीकरण म्हणजे पुरुषांना बाजूला सारणे नव्हे,” असे त्या म्हणाल्या. यावेळी प्रभागातील नागरिकांनी सौ. नीता आंब्रे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला असून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी मोठी उपस्थिती दिसून येत होती. या प्रवासात राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम, शिवसेना नेते रामदास कदम आणि श्रेयाताई कदम यांची ठाम साथ असल्याचेही सौ. आंब्रे यांनी सांगितले. “त्यांच्या मार्गदर्शनाने आमचे काम अधिक प्रभावी होईल आणि महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करणे शक्य होईल,” असे त्यांनी नमूद केले. यावेळी हेमंत साळोखे, मयुरेश दरेकर, प्रथमेश दरेकर, विशाल साळोखे, पुष्पद्र दिवटे, गणेश माने आणि राकेश मोरे यांसह स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. खेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 3 मधील नागरिकांचा वाढता सहभाग आणि महिला नेतृत्वाला मिळत असलेला पाठिंबा, आगामी निवडणुकीत प्रभाग 3 मधून महायुतीच्या उमेदवारांना भरघोस यश मिळण्याची शक्यता राजकीय जाणकारातून व्यक्त केली जात आहे.












