देवगड(प्रतिनिधी)
देवगड शहरात भूमिगत केबल टाकण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू असून या भूमिगत विद्युत वाहिनी चे काम सुरू असताना रस्त्याच्या साईडपट्टीची खोदाई केली आहे ही खोदाई केल्यानंतर त्यात केबल टाकण्यात येते व केबल टाकल्यावर निर्माण झालेले खड्डे चर व्यवस्थितरीत्या बुजविण्यात आलेले नाहीत तात्काळ सुस्थितीत करण्यात यावेत.तरी तसेच डांबरीकरण अथवा काँक्रीटीकरण करून बुजविण्यात यावेत व रस्ता वाहतुकीस सुस्थितीतकरण्यात यावा अशी मागणी भाजप तालुका उपाध्यक्ष उल्हास मणचेकर,शक्तिकेंद्र प्रमुख गणपत गावकर यांनी देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी यांचेकडे केली आहे.यावेळी ग्रामस्थ सुनील रसाळ भाजप सरचिटणीस योगेश चांदोसकर उपस्थित होते.
सध्याच्या मार्ग हा दुचाकी अथवा चार चाकी चालकांना नादुरुस्त स्थितीत झाला असून या मार्गाने जात असताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे छोटे मोठे अपघातही प्रसंगी घडत आहेत तरी देखील या खोदाई करण्यात आलेल्या मार्गाची आवश्यकता प्रमाणात योग्य ती दुरुस्ती करण्यात येऊन सदर मार्ग हा रहदारीकरिता सुस्थितीत करण्यात यावा व वाहन चालकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणीही केली आहे
देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीतील कीनारपट्टीच्या भागात प्रामुख्याने देवगड किल्ला व अन्य भागात महाराष्ट्र वीजवितरण कंपनीच्या भूमिगत विद्युत वाहिनी साठी रस्त्याच्या साईड पट्टीची खोदाई करण्यात आली व त्या चरामध्ये संबंधितभूमिगत विद्युत वाहिनी चे काम करण्यात आले असून ते चर सुस्थितीत बुजवण्यात न आल्याने त्या चरामधील माती चिखल हा रस्त्यावर येऊन प्रसंगी त्या रस्त्यावरून येजा करणारी वाहने घसरणे असे प्रकार वारंवार घडत आहेत अर्धवट स्थितीत खोदाई करण्यात आलेले चर प्रसंगी डांबरीकरण अथवा काँक्रीकरण करून बुजविण्यात यावे व नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यात यावी काही भागात नळपाणी लाईन तुटल्याने पाणी पुरवठा ही खंडित झाला आहे तसेच देवगड सडा भागातील मुणगेकर नगरी येथील रस्त्याचे काम सुस्थितीत करण्यात यावे अशी सूचनाही शक्ती केंद्रप्रमुख गणपत गावकर यांनी देवगड नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे .










