वेंगुर्ले : दाजी नाईक
रेडी गावची ग्रामदेवता देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. रात्री उशिरा कुडाळ विधानसभा मतदार संघाचे आमदार नीलेश राणे यांनी जत्रोत्सवस्थळी भेट देत देवी माऊलीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवस्थान कमिटी व ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी आनंद शिरवळकर, शेखर राणे, माजी शिक्षण – आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, माऊली देवस्थान विश्वस्त संदीप राणे, मानकरी सुहास राणे, दीपक राणे, अमोल राणे, स्वप्नील राणे, पुरुषोत्तम राणे, सागर राणे, अण्णा गडेकर, शेखर वारखंडकर, रोहित गवंडी, बाबाजी राणे, महेश कोनाडकर, प्रसाद रेडकर, रोहित भगत,
ग्रामपंचायत सदस्य सागर रेडकर, शिवसेना उपविभाग प्रमुख सुनील सातजी, शाखा प्रमुख नंदकुमार राणे, आबा राणे तसेच रेडी विकास मंडळ मुंबईचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने रेडी ग्रामस्थ उपस्थित होते.













