रत्नागिरी शहरातील मच्छिमार्केट येथे बीएमडब्ल्यू कारला लागली आग

रत्नागिरी :
शहरातील मच्छिमार्केट येथील फळांच्या वखारीजवळ गुरुवारी सकाळी बीएमडब्ल्यू कारला आग लागल्याची घटना घडली. याबाबत आजुबाजुच्या नागरिकांनी नगरपरिषदेला माहिती देताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत गाडीचे मोठे नुकसान झाले असून याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. गुरुवारी सकाळी मच्छिमार्केट ते जेलरोड जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक काळ्या रंगाच्या उभ्या बीएमडब्ल्यू कारला अचानकपणे आग लागली. गाडीतून धूळीचे लोट आणि आगिच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात येत होत्या. या सर्व भयावह प्रकारामुळे नागरिकांनी तातडीने रत्नागिरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगित कोणतीही जिवीत हानी झालेली नसून कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कार मालकाने शहर पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दिलेली नाही.