मसुरे | झुंजार पेडणेकर : मुणगे येथील भगवती वाचनालयामध्ये जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्म दिना निमित्त त्यांच्या फोटो प्रतिमेस अध्यक्ष गोविंद सावंत यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच यानिमित्त आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष गोविंद सावंत, उपाध्यक्ष महादेव प्रभू ,कार्यवाह शंकर मुणगेकर यांचे हस्ते करण्यात आले. प्रसंगी वाचनालयाचे कार्यवाह शंकर ऊर्फ सुनील मुणगेकर यानी सांगितले कि, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महान योध्दा आणि क्रांतीचे प्रतिक व आदीवासी समाजाचे दैवत भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर – १८७५ रोजी झारखंड येथील “उलीहातू ” या गावी झाला. भगवान बिरसा मुंडा यानी “उलगूलान ” ( महान विद्रोही) च्या माध्यमातून ब्रिटिश राजवटी विरुद्ध आणि जमिनदार-सावरकराच्या शोषणा विरूध्द आवाज उठविला त्याच्या नेतृत्वाखाली संघर्ष हा केवळ आदीवासीच्या हक्कासाठी नसून जल, जंगल, जमीन या नैसर्गिक संसाधनावरील अधिकारासाठी होता. त्यानां ” धरती का आबा” या नावाने ओळखले जाते. .
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद सावंत , उपाध्यक्ष महादेव ऊर्फ तात्या प्रभू कार्यवाह शंकर ऊर्फ सुनील मुणगेकर, सहकार्यवाह मोतीराम ऊर्फ दादा वळंजु, कार्यकारीणी सदस्य संतोष लब्दे, संजय परूळेकर, सुनिल बोरकर, धर्माजी आडकर, सौ उज्ज्वला महाजन तसेच वाचनालयाचे ग्रंथपाल विश्वास मुणगेकर , सोमनाथ रुपे, सौ मुणगेकर, तसेच वाचक सभासद उपस्थित होते. उपस्थित वाचकानी शासनाकडून देण्यात आलेल्या “आदिवासीचे अंतरग ” या पुस्तकाचे वाचन केले. ग्रंथालयाध्ये सांस्कृतिक आणि वाचन चळवळ वृध्दिंगत करण्यासाठी वाचकांनी वाचनालयाचे सभासद होऊन ग्रंथालयातील विविध ग्रंथाचा लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद सावंत यानी केले.












