दापोली :
– दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील दूध उत्पादन वाढवण्यासाठी तसेच या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आमदार श्री. नमदार योगेशदादा रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जाणार असून, मतदार संघातील शेतकऱ्यांना स्वतःचा दुधसंघ उभा करण्याचा मार्ग खुला करण्याचा हा प्रयत्न आहे.