खेडमध्ये दुचाकीची चोरी; बिहारच्या संशयितावर गुन्हा दाखल

खेड: शहरालगतच्या वेरळ खोपी फाटा येथून एक दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फिर्यादी रूपेश गणपत तावडे (वय ३६, रा. सुकीवली) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून एम.डी. आरीफ (मूळ रा. बिहार) याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ५:०० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी यांची ५०,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची ज्युपीटर मोटार सायकल (क्रमांक एमएच ४७ बी एस ९९३१) आरोपीने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. याप्रकरणी पोलिसांनी २१ फेब्रुवारी रोजी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे.