गुहागरात नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत

नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात
युती, महाविकासआघाडी व राष्ट्रवादीमध्ये रंगणार लढती

गुहागर : नगरपंचायत निवडणूकिमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या 10 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.तर नगराध्यक्ष पदासाठीच्या एका उमेदवाराने माघार घेतल्याने आता येथील नगराध्यक्ष निवडणूकीची लढत चौरंगी तर नगरसेवक पदासाठीची निवडणूक बहुतांश ठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुहागर नगरपंचायत निवडणूकिमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 1 जागेसाठी 4 उमेदवार रिंगणात असून नगरसेवक पदासाठी 17 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात आहेत.याठिकाणी राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर झाल्याने ते स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत.तर भाजप व शिवसेना हे युतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात आहेत.तर दूसरीकडे महाविकास आघाडी म्हणजेच उबाठा व राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसे या निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत.मात्र मनसेने अचानक आपल्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उबाठासाठी तो धक्का मानला जात आहे.
नगराध्यक्षपदाच्या 1 जागेसाठी भाजप म्हणजेच युतीच्या माध्यमातून नीता विकास मालप, राष्ट्रवादी कडून सुजाता श्रीधर बागकर, उबाठा म्हणजेच महाविकास आघाडीकडून पारिजात पराग कांबळे तर सर्वप्रथम अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सुप्रिया सुरेश वाघधरे अशी ही चौरंगी लढत असणार आहे. तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून सेनेकडून दीपक अमरनाथ कनगुटकर, उबाठाकडून समीर यशवंत बागकर तर राष्ट्रवादीकडून दीपक ताराचंद्र शिरधनकर अशी तिरंगी लढत, प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपकडून उमेश अनंत भोसले तर उबाठाकडून सतीश वासुदेव शेटे अशी दुरंगी लढत, प्रभाग क्रमांक 3 मध्ये उबाठाकडून रिद्धी राजेश घोरपडे तर सेनेकडून स्वरा गणेश तेलगडे यांच्यात दुरंगी लढत, प्रभाग क्रमांक 4 मध्ये अपक्ष उमेदवार कोमल दर्शन जांगली, भाजपकडून स्मिता दशरथ जांगली तर अपक्ष म्हणून नेहा नितीन सांगळे अशी तिरंगी लढत, प्रभाग क्रमांक 5 मधून अपक्ष उमेदवार म्हणजेच मनसेच्या सिद्धी राजेश शेटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या वैशाली संतोष मावळणकर या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपकडून अनुषा शार्दुल भावे, उबाठाकडून रिद्धी प्रविण रहाटे अशी दुरंगी लढत, प्रभाग क्रमांक 7 मधून सेनेकडून विदिशा धनंजय दणदणे, उबाठाकडून प्रगती सुनील वराडकर अशी दुरंगी लढत, प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपकडून सुषमा सुधाकर रहाटे तर उबाठाकडून रिया संतोष गुहागरकर अशी दुरंगी लढत, प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादीकडून शितल नरेश कदम, भाजपकडून मीरा विकास घाडे, उबाठाकडून वैशाली पराग मालप अशी दुरंगी लढत, प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेनेकडून प्रदीप गोविंद बेंडल तर उबाठाकडून राजेंद्र सिताराम आरेकर अशी दुरंगी लढत, प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेकडून सुजित सुधाकर साटले तर उबाठाकडून प्रवीण प्रकाश रहाटे अशी दुरंगी लढत, प्रभाग क्रमांक 12 मधून उबाठाकडून नीता सतिश गुरव, राष्ट्रवादीकडून अन्विता अभिजीत मांडवकर तर भाजपकडून विशाखा विश्वास सोमण अशी तिरंगी लढत, प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेनेकडून राजेंद्र अर्जुन भागडे तर उबाठाकडून सुजल विष्णू होलंब अशी दुरंगी लढत, प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादीकडून सौरभ राजेंद्र भागडे, भाजपकडून संजय बाळाराम मालप तर उबाठाकडून संगिता संजय वराडकर अशी तिरंगी लढत,प्रभाग क्रमांक 15 मधून शिवसेनेकडून संदेश सुदेश उदेक तर उबाठाकडून अनिकेत प्रकाश जाधव अशी दुरंगी लढत, प्रभाग क्रमांक 16 मधून सेनेकडून अमोल प्रताप गोयथळे, अपक्ष म्हणून मनीष भरत गोयथळे तर उबाठाकडून राज रवींद्र विखारे अशी तिरंगी लढत, प्रभाग क्रमांक 17 मधून राष्ट्रवादीकडून समीक्षा रघुनंदन आरेकर, सेनेकडून सिद्धी समीर आरेकर तर उबाठाकडून श्रिया सागर मोरे अशी तिरंगी लढत होणार आहे. एकूणच या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट, महाविकास आघाडी व भाजप अशी तिरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.