संत गोरा कुंभार नागरी पतसंस्थेच्या एटीएमचा झाला शुभारंभ

 

चिपळूण ( वार्ताहर) : संत गोरा कुंभार नागरी सह .पतसंस्था खेर्डी चिपळूण येथे अत्याधुनिक सेवा म्हणजेच ATM सेवेचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष व पतसंस्था चेअरमन सुभाषजी गुडेकर , तालुकाध्यक्ष प्रकाश साळवी यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला .
ATM सुविधेमुळे ग्राहकांना रोख रक्कम कार्डद्वारे काढणे सोयीचे व वेळेची बचत झाल्याने पतसंस्था ठेवीदार , कर्जदार व समाज बांधव व ग्राहकांना याचा फायदा होणार आहे . या कार्यक्रम प्रसंगी पतसंस्था व्हा चेअरमन तुकारामभाऊ टेरवकर , सुनिल उर्फ नाना टेरवकर , बबनशेठ पडवेकर , जनार्दन मालवणकर , विकास मंडळ उपाध्यक्ष प्रकाशमहाराज निवळकर , सुनिल निवळकर , अमोल पिरदनकर , तुकारामशेठ साळवी , संजय गुडेकर , तंटामुक्ती अध्यक्ष अण्णा गुडेकर , अनंत गुडेकर , संचालिका सौ सुमन साळवी , सौ विमल साळवी , सोनू कुंभार , प्रकाश कराडकर , सुरेश कोळथरकर , प्रदिप शिरकर व सोशल् मिडिया जिल्हाध्यक्ष रविंद्र शिरकर , पतसंस्था समन्वयक व कर्मचारी वृंद उपस्थित होते .