ओटवणेतील विद्यार्थ्याना अर्चना फाउंडेशन च्या वतीने वह्यांचे वाटप

विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप.

ओटवणे(प्रतिनीधी) ओटवणे रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे हायस्कूल येथे अर्चना फाउंडेशन च्या माध्यमातून अर्चना फाउंडेशन च्या सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोंकण महिला विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या मार्फत वह्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर सरपंच आत्माराम ऊर्फ दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर माजी सरपंच रविंद्र म्हापसेकर, सगुण गावकर, नेहा मयेकर , विलवडे सरपंच प्रकाश दळवी, आदि मान्यवर उपास्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक देसाई सरांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी दहावी उत्तीर्ण पहील्या पाच विद्यार्थिनींना विशेष सन्मान पत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. यावेळी अर्चना घारे परब यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन कौतुक करताना शिक्षक वृंदांचे , दहावी प्रथम पाच येणाऱ्या विद्यार्थीनिंचेही कौतुक केले. यात अनुक्रमे तिन क्रमांक करिश्मा राणे, रेश्मा नाईक, सानिका भिसे या विद्यार्थ्यांबरोबर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर उत्तीर्ण सतिशा वर्नेकर आदिती बिरोडकर यांनाही सन्मान पत्र देऊन सन्मानित केले तसेच मॅट्रिक शिक्ष्यवृत्ती मध्ये यश मिळविलेल्या साक्षी गावकर,तन्वी गावकर, रिया सावंत यांचेही कौतुक केले.माजी विद्यार्थी कनय्या मयेकर यांसकडून ही प्रथम तिन क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्याना स्कूल बॅग वितरीत करण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना या शाळेतील अनेक माजी विद्यार्थी आज अनेक चांगल्या पदावर पोहचले आहेत अनेक क्षेत्रात चांगलं काम करीत आहेत आणि आपल्या समोरही अनेक संध्या उपलब्ध आहेत ज्या आपली भविष्यात वाट पाहत आहेत या शाळेत उत्तम शिक्षक आहेत त्यामूळे असे विद्यार्थी घडलेत. आपणही या संधीचा फायदा घेत संधीच सोन करा जिथं अडेल तिथं आपनास अवश्य सांगा सदैव आपल्या पाठीशी राहीन असे उदगार काढलेत तसेच पुढील वर्षी दहावी च्या परीक्षेस जाणाऱ्या विध्यार्थ्यांना मोफत वाहनाची सोय करणार असल्याचे सांगितले.हायस्कूल बरोबर गावातली सर्व शाळेतली विध्यार्थ्यांनाही अर्चना फाऊंडेशन च्या वतीने वह्या वाटप केले जाणार आहेत. यावेळी प्रास्तावीक मुख्याध्यापक देसाई सर यांनी, सूत्रसंचलन जयगणेश गावकर यांनी तर आभार राऊळ सर यांनी मानलेत.