रत्नागिरी :
खेड ते रत्नागिरी अशा प्रवासात बावनदी येथे कर्तव्य बजावणाऱ्या वाहकाला धकलाबुकल व मारहाण करणाऱ्या संशयित प्रवाशाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेत लक्ष्मण तांबे (२६, रा. वेळंब, ता. गुहागर ) असे संशयित प्रवाशाचे नाव आहे. ही घटना रविवारी (२३) सकाळी पावणे बाराच्या सुमारास खेड ते रत्नागिरीकडे येणाऱ्या बसमध्ये बावनदी बसस्टॉपच्या पुढे घडली. फिर्यादी सखाराम परमेश्वर बांगर (३४, रा. वाघेरा ता.पाटोदा जिल्हा बीड. सध्या रा. समर्थ नगर, भरणेनाका, ता. खेड. रत्नागिरी) हे एसटी बस (क्र. एमएच-२० बीएल १९६०) वरील चालक गणेश गुलाब गाडेकर असे खेड-चिपळूण, संगमेश्वर-रत्नागिरी अशी घेवून निघाले होते. वाहक सखाराम बांगर यांनी बावनदी पुलाजवळील बस स्टॉपवर प्रवासी उतरण्यासाठी बेल दिली. व गाडीतील प्रवासी उतरले. व चार प्रवासी बस मध्ये चढले त्यांचे तिकीट काडून त्यांना दिली. त्यातील एक प्रवासी संशयित संकते तांबे यांने बावनदी ते रत्नागिरी असे ४१ रुपयांचे तिकीट काढण्यासाठी ५० रुपयांची नोट दिली. त्यावेळी फिर्यादी वाहक यांच्याकडे पैसे सुट्टे नसल्याने फिर्यादी यांनी संशयित तांबेला रत्नागिरी येथे उतरताना सुट्टे पैसे माझ्याकडे आले की मी तुला देतो. नाहीतर तिकीटाच्या पाठीमागे नऊ रुपये लिहून देतो ते तुला रत्नागिरी डेपो मधून घेऊन जा असे सांगितले. त्यावेळ संशयिताने सांगितले की, तुम्ही खेड मधून आला आणि तुमच्याकडे पैसे नाही असे बोलून संशयिताने रागाच्या भरात वाहकाच्या कानाखाली वाजविली तसेच शिवीगाळ करुन मारहाण केली. या प्रकरणी फिर्यादी सखाराम बांगर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी संशयिताविरुद्द गुन्हा दाखल केला आहे.











