गौरव पोंक्षे । माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून,मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने पिरॅमल संस्थेमार्फत २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत माखजन ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात मधुमेह व उच्च रक्तदाब याची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. तरी सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन माखजन ग्रामपंबचायतिचे सरपंच महेश बाष्टे यांनी केले आहे.
शिबिराला येताना मोबाईल नंबर व आधारकार्ड तसेच चालू असलेल्या औषधांचा तपशील आणणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.











