हडी येथील स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

 मसुरे | झुंजार पेडणेकर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत हडी ग्रामपंचायत येथे गावासाठी एक दिवस एक तास सार्वजनिक ठिकाणी धार्मिक स्थळे, शाळा, अंगणवाडी , शासकीय कार्यालय व सार्वजनिक वाडी रस्ते या ठिकाणी स्वच्छता व साफसफाई करणे मोहीम राबविण्यात आली. सदर स्वच्छता आणि साफसफाई मोहीम साठी हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री चौरे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला बचत गटातील अध्यक्ष, सचिव, सदस्य व सीआरपी, शाळा अंगणवाडीतील विद्यार्थी शिक्षक पालक व ग्रामस्थ सदर मोहीम मध्ये सहभागी झाले होते. सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी सर्वांचे आभार मानले.