महायुतीचे सर्वच्या सर्व १७ नगरसेवक बहुसंख्य मतांनी निवडून येतील- आमदार किरण सामंत
लांजा (प्रतिनिधी) लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे चार हजार पेक्षा अधिक मतांनी निवडून येतील. त्याचप्रमाणे महायुतीचे सर्वच्या सर्व म्हणजे १७ उमेदवार हे देखील बहुसंख्य मतांनी निवडून येतील असा ठाम विश्वास, आमदार किरण सामंत यांनी लांजा येथील पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
लांजा येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयचे उद्घाटन आज मंगळवारी सकाळी करण्यात आले त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की, यापूर्वी जी काही आम्ही विकास कामे केली आहेत आणि भविष्यात करणार आहोत त्यावरच ही निवडणूक लढवली जात आहे आणि आम्ही निवडणूक जिंकणार आहोत. आम्ही खोटं नाटं करून ही निवडणूक जिंकणार नाही. आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा ४००० मतांनी निवडून येईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पक्षात झालेल्या बंडखोरी विषयी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की, आमच्या पक्षातून तीन ते चार ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. अशा बंडखोरांवर लवकरच कारवाई केली जाईल. अन्य कोणी बंडखोरी केलेली असेल त्यांचा या महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, बंडखोरांना एक संधी देणे गरजेचे आहे. प्रथम त्यांना विचारणा केली जाईल. आता तरी आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्याल का? त्यांनी आज संध्याकाळपर्यंत किमान पाठिंबा जाहीर करावा अन्यथा पक्षाकडून त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
लांजा कुवे येथील नागरिकांना आवाहन करताना आमदार किरण सामंत म्हणाले की, लांजा कुवे येथील नागरिकांनी कोणत्याही खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून कोणालाही मतदान करू नये. खोटे बोलायचे आणि लोकांच्या मनावर राज्य करायचे अशी काहीची पध्दत आहे.
शहर विकास आराखडा (डीपी) बाबत बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की,
लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचा डीपी प्लॅन आपण करणार आहोत.
डीपी प्लॅन मध्ये लोकांना अपेक्षित असणाऱ्या सुधारणा आणि बदल करण्यात आलेले आहेत. नऊ फुटापेक्षा अधिक रस्ते असणारे अनावश्यक रस्ते
वगळण्यात आले आहेत. ज्या कोणाच्या वैयक्तिक अडचणी होत्या त्या देखील दूर करण्यात आलेले आहेत. लांजा आणि कुवे येथील नो डेव्हलपमेंट झोन पूर्णपणे काढून टाकण्यात आलेला आहे. सर्वांना सुंदर आणि आवडेल असा डीपी प्लॅन लोकांना दिला जाईल. नजर चुकीने एखादी चूक राहिली असेल ती देखील चूक सुधारली जाईल, असे ठोस आश्वासन आमदार किरण सामंत यांनी दिले .
डीपी प्लॅन मध्ये ज्या हरकती घेण्यात आल्या होत्या त्या सर्व हरकती योग्य होत्या .त्या हरकती मध्ये नक्कीच तथ्य होते. या सर्व सर्वच्या सर्व हरकती दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत असे आमदार किरण सामंत यांनी सांगितले.
विरोधक हे खोट्या पद्धतीने निवडणूक लढवत आहेत. त्यांनी खऱ्या पद्धतीने निवडणूक लढवावी असे आव्हान देताना आमदार किरण सामंत म्हणाले की,माझी तयारी आहे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. विरोधकांनी समोरासमोर येऊन कोणत्याही गोष्टीची खातर जमा करावी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून लांजा शहर सुंदर बनवायचे आहे. त्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. आगामी काळात लांजा शहरातील मूलभूत गरजा यामध्ये वीज पाणी रस्ते या पूर्ण केले जातील.
लांजा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लोकांना अपेक्षित असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम आपण लवकरात लवकर हाती घेणार आहोत. शहरात गार्डनची आवश्यकता आहे हे देखील काम आपण लवकर लवकर मार्गी लावू. नमो उद्यान म्हणून आपल्याला लांजा शहरा करता एक कोटीचा निधी मंजूर आहे. हे देखील काम लवकरच सुरू केले जाईल.
लांजा शहराचा अधिवेशन दिवस विस्तार होत आहे मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम होत आहे अशावेळी अग्निशमन ची असलेली गरज लक्षात घेऊन अग्निशमन वाहन नसल्याने अडचण बसते हसते ही अडचण देखील दूर केली जाईल .शहरातील असणाऱ्या ऐतिहासिक तळींची सुशोभीकरण करण्यात येणार आहे
लांजा शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारी नळ पाणी योजना ही यापुढे सौर उर्जेवर केली जाणार असून त्यानंतर लोकांना पाणीपट्टी कमी बसेल आणि आपसूकच लोकांना त्यांचा फायदा होईल याचबरोबर भूमिगत वीज वाहिनी, भूमिगत सांडपाण्याची प्रकल्प असेल अंतिम टप्प्यात काम आलेले आहे
या पत्रकार परिषदेला आमदार किरण सामंत यांच्यासह शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप , प्रसन्न शेट्ये, जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक महेश खामकर, युवा सेनेचे प्रसाद माने आदींसह अन्य उपस्थित होते.











