पालकमंत्री उदय सामंत यांचे युतीच्या प्रचारसभेत गुहागरवासीयांना आश्वासन
गुहागर प्रतिनिधी
गुहागरच्या विकासासाठी सर्वांनी आदर्शवत काम करा. शहराच्या विकासासाठी निधीची कधीच कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. ते गुहागर नगरपंचायत भाजप -सेना युतीच्या उमेदवारांच्या निवडणुक प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, भावनेच्या आहारी न जाता विकासाला मतदान करा आणि आपले सर्व युतीचे उमेदवार निवडून आणा.यावेळी त्यांनी युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नीता मालप यांना सांगितले की, गुहागर ही छोटी नगरपंचायत आहे.या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे.या नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रभाग पुढील पाच वर्षात सुमारे 200 ते 250 मुल मुली ही मुख्यमंत्री रोजगार योजना यामार्फत स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजेत असा संकल्प करा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चौकट- निरामय हॉस्पीटल लवकरच सुरू करण्याचा पुनरुच्चार उदय सामंत यांनी या प्रचारसभेत केला.तसेच विजयी निवडणूकिसाठी आपण नक्की येऊ आणि येताना भरघोस निधी घेऊन येऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर माजी आम.डॉ.विनय नातू, माजी आम.संजय कदम, सेनेचे नेते शशिकांत चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष सतिश मोरे, रामचंद्र हुमणे,मुन्ना देसाई,राजू महाडिक, भाजप जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे,जिल्हा नियोजन समिती सदस्या नेत्रा ठाकूर ,माजी जि.प.अध्यक्ष महेश नाटेकर, दीपक कनगुटकर,राजेश बेंडल,दिप्ती असगोलकर, विलास वाघे, सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरदिप परचुरे यांनी केले.













