गोळवण शाळा येथे संविधान दिन साजरा!

मसुरे | झुंजार पेडणेकर : ग्रामपंचायत कार्यालय गोळवण – कुमामे – डिकवल येथील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा गोळवण नंबर – 1 येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या शिक्षिका सौ. देशमुख मॅडम यांनी भारताचे संविधान विषयी सविस्तर माहिती सांगितली व विद्यार्थ्यांनीही भारताचे संविधान विषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. पाताडे सर यांनी भारताचे संविधान या विषयी आपले मनोगत व्यक्त करून आभार प्रदर्शन केले.

यावेळी सरपंच श्री. सुभाष लाड, ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. प्रियांका विलासराव मनवर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. पाताडे सर, श्रीम. पावसकर मॅडम, श्रीम. देशमुख मॅडम, श्री. जाधव सर तसेच अंगणवाडी सेविका श्रीम. जाधव मॅडम, शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनी तसेच गावातील ग्रामस्थ श्रीम. शलाका पवार, श्री. शशिकांत पवार, श्री. नारायण परब, श्री. प्रदीप नाईक, श्री. शांताराम परब, आरोग्य सेवक वासुदेव वाडकर, श्री. भाया नाईक, श्री. बाळाराम परब , श्रीम. करुणा राणे, कोमल मांजरेकर, समिता गावडे उपस्थित होते.