शेकडो कार्यकर्त्यांसह केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश
सावंतवाडी : सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी व माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी आज आपल्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना त्यांचा झालेला हा प्रवेश शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी, माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांसह उबाठा शिवसेनेच्या सायली शिंदे, प्राजक्ता बांदेकर, इम्रान शेख, जावेद शेख, सुजाता शिंदे, नेहा तावडे, पुजा मिशाळ आदींसह प्रभाग क्रमांक ३ मधील शेकडो जणांनी भाजपात प्रवेश केला. माजी नगरसेविका शुभांगी सुकी या शिवसेना पक्षात कार्यरत होत्या. श्री. सुकी देखील उपनगराध्यक्ष राहिले असून १० वर्ष कार्यरत होते. आज या दोघांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, भाजप युवा नेते विशाल परब,
सौ. वेदीका परब, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, संध्या तेरसे, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, रविंद्र मडगावकर, केतन आजगावकर, मोहिनी मडगावकर, शर्वरी गावकर, रेश्मा सावंत, मानसी धुरी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













