घनश्याम तांबे यांना पितृशोक

देवगड: दहिबाव ता.देवगड येथील रहिवासी नामदेव तुकाराम तांबे (वय 87) यांचे बुधवारी( ता.26) निधन झाले.

आदिवासी विकास विभागाचे अधिक्षक घनश्याम तांबे यांचे ते वडील होत. श्री.नामदेव तांबे यांनी बरीच वषेँ मुंबई पोलीस दलात सेवा बजावली. ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदा वरुन सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या नंतर त्यांचा मोठा विवाहीत मुलगा मुंबई पोलीस दलात सेवेत आहे. सेवानिवृत्ती नंतर ते गावी स्थायिक झाले होते. गावी त्यांची आंबा बागायती आहे. त्यांची एक विवाहित मुलगी मुंबईत स्थायिक आहे. घनश्याम हे त्यांचे धाकटे चिरंजीव पालघर येथे आदिवासी विकास विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे।