माखजन :
नगरपंचायतीच्या पाठोपाठ पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत.या पार्श्वभूमीवर सर्वत्र वातावरण तापू लागले आहे.
धामापूर पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा कार्यकर्ते,कळंबुशी गावचे सुपुत्र अक्षय अरुण चव्हाण निवडणूक लढवणार आहेत.
धामापूर पंचायत समिती गणांत धामापूर,कळंबुशी,कासे असावे,पुर्ये,शिरंबे,नारडूवे, पेढांबे ,कुंभारखाणी खुर्द आदी गावांचा समावेश होतो.
अक्षय चव्हाण यांचा जनसंपर्क चांगला आहे,व गावा गावातील विविध कामात सक्रियतेने लक्ष घालत असल्याने,व अधिक जोमाने काम करता यावे यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांची आई श्रीमती अंकिता चव्हाण या कळंबुशी गावच्या सरपंच राहिल्या आहेत.शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस च्या फ्रंट लाईन कार्यकर्त्या असल्याने त्यांचा ही जन संपर्क चांगला आहे.
तरुण उमेदवार म्हणून सध्या अक्षय कडे पाहिलं जात आहे.













