प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. रुपेश परुळेकर करणार मार्गदर्शन
मसुरे | झुंजार पेडणेकर : ग्रामपंचायत कार्यालय गोळवण-कुमामे-डिकवल येथे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजने अंतर्गत ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमास वराड गावचे सुपुत्र व मालवण तालुक्यातील प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. रुपेश परुळेकर हे उपस्थित राहुन महिलांना न्याय व्यवस्थे बद्दल माहिती, महिला सुरक्षितता तसेच महिलांचे आरोग्य याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
त्याचप्रमाणे डॉ. दादासाहेब वराडकर हायस्कूल कट्टा येथील श्रीम. मलये मॅडम ह्या महिला सुरक्षितता विषयक लाठीकाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थित सर्व महिला व पुरुष ग्रामस्थांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे.तरी गाव गोळवण, कुमामे व डिकवल मधील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आहे आवाहन सरपंच सुभाष लाड यांनी केले आहे.










