वैभववाडी l प्रतिनिधी : खांबाळे केंद्रस्तरीय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव दिमाखात संपन्न झाला. कोकिसरे येथील माधवराव पवार माध्यमिक विद्यालय प्रशालेच्या क्रीडांगणात स्पर्धा पार पडली. संपन्न झाली. स्पर्धेमध्ये विद्यामंदिर खांबाळे धनगरवाडी शाळेच्या तेजस्वी अनंत लांबोर हिने लांबउडी व 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता. सदर दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये तिने उत्तम कामगिरी करत केंद्रस्तरावर लांबउडी मध्ये प्रथम तर 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
दुर्गम भागात राहून विविध सुविधांचा अभाव असताना देखील या विद्यार्थिनीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या तिच्या यशाकरिता वर्गशिक्षिका शोभाताई केळकर, सुधीर बावडेकर, मुख्याध्यापक चेतन बोडेकर व पालक संजना बरगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. क्रीडा स्पर्धेत केलेल्या तिच्या उत्तम कामगिरीबद्दल केंद्रबलाचे केंद्रप्रमुख नितीन कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सविता बरगे, उपाध्यक्ष विजया अडुळकर व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.












