भारतीय वंशाच्या संशोधकाकडे Apple ची मोठी जबाबदारी, Amar Subramanya कोण? जाणून घ्या

अ‍ॅपलने आपल्या AI ची कमान एका भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे सोपवली आहे. अ‍ॅपलने सोमवारी ज्येष्ठ AI संशोधक अमर सुब्रमण्य यांची AI चे नवीन उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. सुब्रमण्यम सॉफ्टवेअरचे प्रमुख क्रेग फेडेरिघी यांना रिपोर्ट करतील आणि अ‍ॅपल फाउंडेशन मॉडेल्स, मशीन लर्निंग रिसर्च आणि AI सुरक्षा आणि मूल्यांकनासह अनेक प्रमुख क्षेत्रांचे नेतृत्व करतील, असे कंपनीने जाहीर केले. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.