देवरूख :
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मंगळवारी सकाळपासून शांततेत मतदान सुरू असून ११.३० वाजेपर्यंत ३२. ८६ % मतदान झाले आहे. यात ३५४५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
नगरपंचायत निवडणुकीसाठी सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. आत्तापर्यंत सुरळीतपणे मतदान झाले आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत ३२. ८६ % टक्के इतके मतदान झाले असून ३५४५ मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये १८९७ पुरुष व १६४८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष ३६. ४ % तर महिला २९.५३ अशी टक्केवारी आहे. सकाळी १० वाजेपर्यंत मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. त्यानंतर गर्दी हळुहळु कमी होत गेली. सायंकाळपर्यंत मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, मतदारांच्या चेहऱ्यावर उत्साह पहावयास मिळत आहे.









