देवरूख नगरपंचायत निवडणूक; दु. ३.३० वाजेपर्यंत ६४.५५ % मतदान

दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६,९६५ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

देवरूख :

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान पार पडत आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६४.५५ % मतदान झाले आहे. यात ६,९६५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

नगरपंचायत निवडणुकीसाठी सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. आत्तापर्यंत सुरळीतपणे मतदान झाले आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६४.५५ % टक्के इतके मतदान झाले असून ६९६५ मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये ३४५९ पुरुष व ३५०६ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष ६६.४१ % तर महिला ६२.८२ % अशी टक्केवारी आहे. दुपारपर्यंत मतदानाच्या टक्केवारीत चांगल्याप्रकारे वाढ झाली आहे.