मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, जोगेश्वरी मुंबई संचालित श्री क्षेत्र संतपीठ श्री स्वामी समर्थ मठ, हडपीड येथे ०४ डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती उत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
बुधवार दिनांक ०३ डिसेंबर रोजी सकाळी ०१.०० वा. रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
०४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०७.०० वा. ते ९.०० वा. श्री गणेश पुजन, पादुका पुजन,पुण्यवाचन, होमहवन, सकाळी ९ ते ११ वा. लघुरुद्र, कुंकू मार्चन, सकाळी ११ ते १२ वा. पालखी सोहळा,
दुपारी १२ ते १२.३० वा. आरती, दुपारी १ ते ३ वा.महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ वा. अक्कलकोट दर्शन यात्रा भाग्यवंत लॉटरी सोडत.सायं. ४ ते ५ वा. नामस्मरण, सायंकाळी ५.३० वाजता स्वरगंध प्रस्तुत – भक्तीसंध्या कार्यक्रम.
गायिका सौं, राधा जीशी, कु. मानसी करंदीकर, सौ. प्रियांका वेलणकर.
गायक- राकेश मिठबावकर, प्रज्वल हिंदळेकर साथ करणार आहेत.
उपस्थितीचे आवाहन
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित : श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड कार्यकारी मंडळ (मुंबई),गाव समिती (हडपीड देवगड) यांच्या वतीने अध्यक्ष श्री. प्रभाकर राणे,सचिव श्री. नंदकुमार पेडणेकर,
खजिनदार श्री. ज्ञानेश्वर राऊत यांनी केले आहे.











