श्री स्वामी समर्थ मठ मसदे- वडाचापाट येथे दत्त जन्मोत्सव!

मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू. सद्‌गुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्री सद्‌गुरु भक्त सेवा न्यास रजि. संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे- वडाचा पाट येथे ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.०० वा. अभिषेक व पूजन,

सकाळी ९.०० वा. श्री सत्य दत्त पूजा, सकाळी ११ वा. नैवेद्य व आरती,

दुपारी १.०० वा. महाप्रसाद-अन्नदान,

सायं. ४.३० वा. सुस्वर भजन श्री देवी भगवती प्रासादिक भजन मंडळ, मुणगे आडवळवाडी, ता. देवगड बुवा- श्री समीर महाजन, पखवाज- श्री. सुनिल बोरकर, सायं. ६.३० वा. दैनंदिन उपासना,सायं. ७.३० वा. महाआरती, रात्रौ ८.३० वा महाप्रसाद-अन्नदान

उपस्थितीचे आवाहन

श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास, रजि. संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.