मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्तमंदीर येथे ४ ते ५ डिसेंबर अखेरपर्यंत दत्त जयंती उत्सव संपन्न होणार आहे. ०४ डिसेंबर रोजी
सकाळी ९.०० वा.श्री दत्तगुरूंचे पुजन व अभिषेक, सकाळी १०.०० वा.अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. प्रथम पारितोषीक 2001/-
(श्री. महेश बागवे व श्री. प्रकाश बागवे यांजकडून),व्दितीय पारितोषीक 1501/-(श्री. शैलेश बागवे यांजकडून),
दुपारी १२.०० वा. महाआरती,सायं. ७.०० ते ८.०० वा.सुस्वर गायन (कु. तन्मय मेस्त्री),रात्रौ ८.०० ते ९.०० वा.
श्री समर्थ बागवे महाराज संस्थानाचे भजन
रात्रौ ९.३० ते ११.०० वा. संगित मैफल (गायक-श्री. अजय दुखंडे) रात्रौ ११.०० वा.
दिपोत्सव, रात्रौ १२.०० वा.श्री दत्तजन्म सोहळा व महाआरती, पालखी प्रदक्षिणा, तिर्थप्रसाद.
०५ डिसेंबर रोजी
सकाळी पुजाआर्चा,
दुपारी २.०० ते ४.०० : महाप्रसाद,रात्रौ ९.०० : ओंमकार पारंपारीक लोककला दशावतार नाट्यमंडळ म्हापण, वेंगुर्ला यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग ‘देवी भयमाया ‘ होणार आहे. उपस्थितीचे आवाहन समर्थ बागवे महाराज संस्थांनाच्या वतीने करण्यात आले आहे.










