गुहागर प्रतिनिधी
गुहागर तालुक्यातील पालपेणे येथील जनसेवा एज्युकेशन सोसायटी संचलित वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणे येथे माजी विद्यार्थी, वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणे यांच्या सहकार्यातून साकारण्यात आलेल्या गुरुदक्षिणा सभागृहाचा संस्थार्पण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी जनसेवा एज्युकेशन सोसायटीचे संस्था कार्यालय व विद्यालयातील एमएससीआयटी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन ही करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जनसेवा एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष विष्णु पालकर यांनी भूषवले. गुरुदक्षिणा सभागृहाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक पी व्ही हासबे यांच्या हस्ते करण्यात आले. तर संस्था कार्यालयाचे उद्घाटन संस्थेचे माजी सचिव भिकाजी पडवेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच विद्यालयामध्ये नव्याने सुरू होत असलेल्या एमएससीआयटी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संस्थेचे माजी अध्यक्ष गणपत खैर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी संस्थेचे माजी अध्यक्ष गणपत खैर , सचिव नथुराम हरचिलकर माजी सदस्य रमेश खैर तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व माजी विद्यार्थी कमिटीचे अध्यक्ष अरविंद पालकर ,संस्थेचे सचिव निलेश गोविंद टाणकर संस्थेचे खजिनदार शैलेश खैर , वैभव पडवेकर ,संदीप पडवेकर , कृष्णा पालकर , वसंत मांडवकर, भालचंद्र मांडवकर , तुकाराम मांडवकर हेही यावेळी उपस्थित होते . या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पाटील , माजी शिक्षक घोरपडे हेही उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली .विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर असे ईशस्तवनव स्वागत पद्य सादर केले.. यानंतर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा सभागृहास सहकार्य केले बद्दल त्यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये 30 बॅच उपस्थित होत्या. त्याचबरोबर या सभागृहासाठी ज्या माजी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आर्थिक सहाय्य केले होते त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. गुरुदक्षिणा सभागृहासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले होते अशा सर्व माजी विद्यार्थ्यांचा संस्थेकडून यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जनसेवा एज्युकेशन सोसायटीस कायमस्वरूपी ठेव देणाऱ्या देणगीदारांचा सन्मानपत्र शाल शफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यानंतर मान्यवरांची मनोगते झाली .यामध्ये माजी विद्यार्थी विलास मांडवकर, उमेश खैर , या गुरुदक्षिणा सभागृहाचे संकल्पक श्री संजय दत्ताराम पालकर . शैलेश गमरे, वरेकर , आकाश पालकर कुंदा मांडवकर, मिनल माचिवले , विनोद कासार , पेवे सरपंच व विद्यालयाचे माजी विद्यार्थी मंगेश सोलकर , तसेच माजी मुख्याध्यापक पाटील, माजी विद्यार्थी नियोजन कमिटीचे अध्यक्ष अरविंद पालकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक व गुरुदक्षिणा सभागृहाचे उदघाटन श्री हसबे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व माजी विद्यार्थ्यांचे गुरुदक्षिणा सभागृहासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू कृष्णा पालकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये माजी विद्यार्थ्यांचे व संस्थेस ज्यांनी कायमस्वरूपी ठेव दिली त्या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.












